कान :-
बहिरेपणा
या विभागात बहिरेपणाची वेगवेगळी कारणे तसेच लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यासम्बधी माहिती दिली आहे.
कान वाहणे
कानातून पू किंवा पाणी वाहणे हा सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. काही वेळा हा आजार तीव्र असतो व बरेच दिवस टिकतो.
नाकातून रक्त येणे
नाकातून वेगवेगळ्या कारणामुळे रक्त येत असते. त्याची कारणे आणि नाकातून रक्त आल्यास काय करावे याची माहिती दिली आहे.
सायनसायटिस
सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. आणि सायनसायटिस होतो म्हणजे जेंव्हा सर्दी झाल्यावर सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागल्यावर जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात.
कानांची व नाकाची निगा
नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.
कानाची रचना आणि कार्य
बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात.
बाह्यकर्णाचे आजार
कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात.
कानात किडा जाणे
कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते.
मध्यकर्णाचे आजार
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.
अंतर्कर्णाचे आजार
मध्यकर्णाच्या आजाराने कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.
**************************
कान व कसा :-
बातम्यासायनसच्याक व घशाचे
आयुर्वेदातील शालाक्य तंत्रात कान, नाक, घसा, तसेच डोळे, डोके, मेंदू यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, रोग झाल्यास काय उपचार करावेत, याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. कान, नाक, घसा यांच्यात इतका जवळचा संबंध आहे, की कर्णपूरण, नस्य, नेत्रबस्ती, शिरोधारा वगैरे उपचार या सर्व अवयवांसाठी उपयोगी असतात.
शारीरिक, तसेच कार्यकारितेच्या दृष्टीने जवळचा संबंध असणाऱ्या कान, नाक व घसा या तीन अवयवांपैकी कानाच्या आरोग्याबद्दल आपण मागच्या आठवड्यात जाणून घेतले. नाक व घसा यांची काळजी कशी घ्यावी हे आपण आज पाहू या.
कानाप्रमाणे नाक हेही पंचज्ञानेंद्रियांपैकी एका इंद्रियाचे राहण्याचे ठिकाण असते. गंध अर्थात वास येण्यास कारणीभूत असणारे घ्राणेंद्रिय नाकाच्या आश्रयाने राहते. याशिवाय नाक हे शिराचे प्रवेशद्वारही असते, म्हणूनच औषधाद्वारा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्य हा उपचार करता येतो. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे नाक अशा प्रकारे मेंदूपर्यंत पोचण्याचेही एक माध्यम असते. श्वासोच्छ्वाससुद्धा नाकामधून होत असतो. वातावरणातील अशुद्धी, धूळ-धुराचे सूक्ष्म कण श्वासामार्फत सरळ शरीरात जाऊ नयेत यासाठी नाक या अवयवाची रचना केलेली आहे. नाकाच्या आतील बाजूला चिकट अस्तर असते, यामध्ये हवेतील अशुद्धता, बारीक कण अडकून राहू शकतात व आत जाण्यापासून थोपविले जाऊ शकतात. नाकाच्या मध्यभागी असणाऱ्या मांसल पडद्यावर अतिसूक्ष्म व खूप मोठ्या संख्येने रक्तवाहिन्या असतात, यामुळे श्वासावाटे आत जाणारी हवा किंचित दमट व उबदार बनविली जाते. वासाचे ज्ञान करविणाऱ्या विशेष ग्रंथी नाकाच्या वरच्या एक तृतीयांश भागात असतात व तेथून गंधाचे ज्ञान मेंदूपर्यंत पोचवले जाते.
नाक खाली घशाशी व वर सायनसच्या मार्फत डोळ्यांशी जोडलेले असते, तसेच त्याच्याही वर मेंदूशी संबंधित असते. म्हणूनच नाकाची नीट काळजी घेणे अत्यावश्यक असते.
*
कान हा देखील आपल्या शरीराचा नाजूक अवयव असून डोळ्या इतकाच कान हा ही महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांच्या कानाची अधिक काळजी घ्यावी लागत असते. कारण मोठ्या व्यक्तीपेक्षा लहान मुलांच्या कानातील पडदा हा पातळ असतो.
सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने श्रवणक्षमता हळूहळू कमी होत जाते. फटाके, वाहनांचा आवाज व मोठ्याने बोलण्याच्या आवाजाने कानावर दुष्परीणाम होतो. त्यामुळे शक्यतो अशा आवाजापासून दूर राहावे. ते शक्य नसल्यास कानात कापसाचे बोळे घालावेत.
कानाला इअरफोन लावून सतत एफएम ऐकल्यास, बंद कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्यास कानास त्रास होतो. दोन्ही ठिकाणी आवाजाच्या लहरी बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने कानावर ताण येतो.
कान साफ करण्यासाठी कान कोरणे, काडेपेटीतील काडी, बड्स वापरले जातात. त्यामुळे आपण कानातला मळ बाहेर काढण्यापेक्षा आत ढकलत असतो. कानाचा पडदा अतिशय नाजूक असतो. त्याला जरा जरी स्पर्श झाला तरी कान दुखतो. त्यामुळे कानाची स्वच्छता करण्यासाठी अशा वस्तू वापरू नयेत. कानात भरपूर मळ आला असल्यास ड्रॉप्स घालावेत.
वार्यावर जाताना कान झाकावेत अथवा रूमाल बांधावा. गार वारा कानात गेल्यास तापमान कमी होऊन सायनसचा त्रास होण्याची भिती असते.
*
कानाने बहिरा, मुका परि नाही’ कानाचे महत्त्व सांगण्यासाठी हा अभंग पुरेसा आहे. ऐकूनच माणसाला बोलता येतं या तत्वानुसार कानाने ऐकताच न येणाऱ्या व्यक्तींना मुकेपणा नसतानाही बोलणं शक्य होत नाही. कानाच्या निष्क्रियतेमुळे श्रवण आणि त्यामुळे इतरांशी संवाद अशक्य होतो. परिणामी व्यक्तीचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. कान निष्क्रीय असतील तर चारी बाजूंनी वेढलेल्या पण एकाकी बेटासारखी व्यक्तीची अवस्था होते. म्हणूनच कानाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हल्लीच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाने वेढलेल्या परिस्थितीत कानासारख्या इंद्रियांची काळजी क्रमप्राप्त ठरते. घामाच्या धारा वहायला लावणाऱ्या उन्हाळ्यासह थंडी आणि पावसाळ्यातही कानांची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कानाची काळजी घेण्याबाबतच्या उपायांची माहिती आपण आज करून घेणार आहोत. मात्र त्याआधी कानाच्या रचनेचा गोषवारा आपण घेऊ.
कानात अडकवलेली डुलं आपल्याला मनमोहक वाटतात मात्र बाहेरून दिसणारा कान आतमध्येही खूप गहन असतो. मुख्यत: बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण अशा तीन भागांत कानाचे वर्गीकरण केले जाते.
बाह्यकर्ण - बाह्यकर्णाची रचना बाहेर पसरट आणि आत नळीप्रमाणे अरुंद होत जाणारी असते. बाह्यकर्णाच्या
त्वचेतून तेलकट पदार्थ पाझरतो. त्यामुळे हा भाग कोमल, मऊ आणि नाजूक राहतो.
मध्यकर्ण - मध्यकर्ण म्हणजे हाडामधील एक छोटीशी पोकळी असते. जिच्या एका बाजूला कानाचा पडदा असतो आणि दुस-या बाजूला अंतर्कर्णाचा शंख असतो.
अंतर्कर्ण - अंतर्कर्ण म्हणजे हाडांच्या पोकळीतला नाजूक शंख. ध्वनिलहरींचा संदेश चेतातंतूंच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचवणे हे या शंखाचे मुख्य काम होय. अंतकर्णाचे दुसरे महत्त्वाचे शरीराचा तोल सांभाळणे.
अंतर्कर्णातील एका विशिष्ट भागात द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थात शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करणाऱ्या पेशी असतात. या पेशींची रचना आश्चर्यकारक असते. मात्र या पेशींमध्ये असंबंध हालचाली झाल्यास शरीराचा तोल जातो.
कानचे कार्य हे महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य निगा आणि काळजी घेण गरजेचं असतं. आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सजगता क्रमपाप्त ठरत असते. म्हणूनच आपण आज कानाची काळजी घेण्याबाबत जाणून घेणार आहोत.
सतत मोठ्या आवाजात काम करणं, फटाके, जास्त आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाईलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाईलचे इयरफोन कानाला लाऊन मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश आवाज सतत कानावर पडणे आदी गोष्टींमुळे कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी
होत जाते. श्रवणक्षमता कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्यानं बोलू लागते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेचच उपचार करून घ्यावेत. सतत मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी किमान सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी. मोठ्या आवाजात काम करणाऱ्यांनी कानात कापसाचे बोळे घालणे उत्तम.
कानातला मळ काढण्यासाठी काही घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. दोन ते तीन दिवस रात्री झोपताना कानात ग्लिसरीनचे दोन ते तीन थेंब टाकावेत किंवा दोन चमचे खोबरेल तेलात लसणाच्या दोन पाकळ्या टाकून लसून लाल होईपर्यंत गरम करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड झाल्यावर कानात टाकावं. त्यामुळे कानातला मळ मऊ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कानात हायड्रोजन पेरॉक्साईडचे दोन थेंब टाकले तरी कानातला मळ मऊ होतो. मऊ झालेला मळ अलगद काढून घ्यावा. मात्र कित्येकदा कानातला मळ कडक होऊन तो निघेणासा होतो. अशावेळी जबरदस्तीने मळ काढण्यापेक्षा डॉक्टरांकडून काढणं फायदेशीर ठरतं. कानातला मळ कडक होऊन खडा होऊ नये म्हणून आपल्याकडे कानात रोज तेल घालण्याची पद्धत आहे. मात्र रोज तेल घालण्याच्या सवयीमुळे कानात बुरशी होऊन जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणून पंधरा ते वीस दिवसांतूनन कानात तेल घालावं.कानात मळ साचणेही कानाच्या आरोग्याला अपायकारक असते. उन्हाळ्यात घामाचे पाणी कानात जाण्यामुळे, धुळीचे कण तसेच अंघोळ करताना साबण कानात जाण्यामुळे कानात मळ साचतो. त्यामुळे कानाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. तसेच कानातला मळ वरचेवर साफ करणंही आवश्यक असतं. मात्र कान साफ करताना कान कोरणे, काडेपेटीतील काडी वापरणं कानासाठी घातक ठरू शकतं. कान साफ करण्याच्या इशा साधनांमुळं कान बाहेर निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने पडद्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते.
म्हणून कानातला मळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातला मळ काढणाऱ्यांकडून मळ अजिबात काढू नये. कधी कधी कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखं वाटतं. अशावेळी हाताची बोटं, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यानं कानाला इजा पोहचून कानात रक्तस्त्राव होऊ शकतो.
पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातलं पाणी काढणं गरजेचं असतं. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणं गरजेचं असतं. कानात पाणी साचून राहिल्यानं कानात बुरशी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी. पावसाळ्यातही कानात पाणी जाऊन कान ओला राहतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कानाची विषेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कानाला मफलर किंवा उबदार कपडा बांधावा, कानात थंड हवा जाऊ न देण्याची काळजी घ्यावी. जोराचा वारा तसेच प्रवास करताना कानाला कपडा बांधावा. अशाप्रकारे कानांची काळजी घेतल्यास जगाला ऐकत राहण्यातला आनंद आपण आयुष्यभर घेऊ शकतो.

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की हैराण करतात. कानदुखीचा अनुभव हा बहुतेक प्रत्येकाने सोसलेला असतोच. कानाच्या विकारांवरही घरच्या घरी सोपे उपाय करता येतात ते असे-
१)कान दुखणे- गरम पाण्याच्या पिशवीने कान शेकावा. तेल घालू नये.
२)कानात काही गेल्यास – पाखरू, तुकडा, काडी मोडणे कानात गेलेली वस्तू शक्यतो आपसूकच बाहेर येते असते. पण काडी वगैरे अडकून बसल्यास तज्ञ डॉक्टरांकडून काढून आणावी. आपणच कान कोरणे वगैरे प्रकार करून नयेत.
३)कान फुटणे- नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा हा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय करावेत.
४)कानात दडे बसणे – कान शेकावा अथवा कोणत्याही उपायाने शिंका काढाव्यात. त्यामुळे कानातले दडे कमी होतील.
५)कानात मळ साठल्यास – कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपाआप बाहेर पडतो.काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.
६)कान चिघळणे – बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.
७)कान खाजणे – कान कोरडा पडून खाजत असल्यास कापसाने आतून तेलाचा लेप लावावा.तेल कानात ओतू नये.

No comments:
Post a Comment