Pages

हाडे (अस्थी) कना, मनका


प्रौढ मानवी शरीरात एकुण २०६ अस्थी असतात. त्यांची संख्या व वर्गीकरण पुढीलप्रमाणे:
शाखा: एकुण अस्थी १२०
उर्ध्वशाखा (हात) ३०+३०=६०
प्रगंडास्थी १
अंतःप्रकोष्ठास्थी १
बहिःप्रकोष्ठास्थी १
मणिबंधातील अस्थी ८
हाताच्या पंजातील अस्थी ५
बोटांच्या अस्थी १४
अधोशाखा ३०+३०=६०
उर्वस्थी १
जान्वस्थी १
टिबिया १
फिबुला १
घोट्यातील अस्थी ७
पायाच्या पंजातील अस्थी ५
बोटांच्या अस्थी १४
पाठीचे मणके २६
मानेतील मणके ७
वक्षातील मणके १२
कटीभागातील मणके ५
Sacrum १
Coccyx १
छातीच्या बरगड्या २४
अक्षकास्थी २
उरोस्थी १
स्कॅपुला २
भगास्थी २
कपालातील अस्थी ८
चेह-यातील अस्थी १४
कंठातील अस्थी (Hyoid bone) १
अंतःकर्णातील अस्थी ३+३=६
*************************
कणा व मणका
कणा व मणका लहान लहान परंतु भक्कम अशा गोलाकार अस्थींचा मिळून पाठीचा कणा तयार हया ो. याला पृष्ठवंश किंवा कशेरुक दंड असेही म्हणतात. त्या प्रत्येक लहान अस्थीला मणका किंवा कशेरुक असे नाव आहे. या लहान लहान अस्थी एकीवर एक अशा बसविलेल्या असून त्यांची एक साखळीच बनल्यासारखी असते. या साखळीमुळे शरीराला मध्य रेषेत बळकट असा आधारमिळतो. दोन अस्थींच्या किंवा मणक्यांच्या मध्ये कमीजास्तजाडीची उपास्थिचक्रे (सांध्यातील अस्थींच्या पृष्ठभागावरअसणाऱ्या लवचिक व एक प्रकारच्या संयोजी म्हणजे जोडणाऱ्या पेशीसमूहाच्या चकत्या) असल्यामुळे कण्यालालवचिकपणा प्राप्त होऊन त्याची विशिष्ट मर्यादेपर्यंत हालचाल होऊशकते. प्रत्येक मणक्याच्या मध्यभागी जी पोकळी असते तिच्यामुळेकण्याच्या मध्यभागी असलेला मेरुरज्‍जू (मेंदूच्या मागीलभागापासून निघालेला आणि मणक्यांच्या आतील पोकळीतून जाणारा मज्‍जातंतूंचा दोरीसारखा जुडगा) सुसंरक्षित राहू शकतो.
सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पाठीला अस्थिमय असा कणा असतो; पण त्यातील मणक्यांची संख्या त्या त्या प्राण्यांची जीवनपद्धती, सवयी व उत्क्रांती यांमुळे कमीजास्त असते. साधारण मानाने ही संख्या ३०-३१ पासून ७० पर्यंत असू शकते.
भ्रूणावस्थेत (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या अवस्थेत) पचननलिका व मेरुरज्‍जू यांच्यामधील जागेत पृष्ठरज्‍जूच्याभोवती (पेशींचा बनलेला लवचिक आधार-अक्ष किंवा कणा याभोवती) पृष्ठवंशाची उत्पत्ती होते. प्रत्येक भ्रूणखंडातील मध्यस्तराची वाढ होत जाऊन त्या ठिकाणी अस्थी तयार होतात. या अस्थींचा मेरुरज्‍जूला वेढा पडल्यासारखा होऊन पाठीचा कणा तयार होतो. काही कनिष्ठ पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पृष्ठरज्‍जू तसाच राहतो तर काही मत्स्यांच्या शरीरातील कणा उपास्थींचाच बनलेला असतो.
कण्यांचे स्थानपरत्वे पाच भाग कल्पिले आहेत. त्यांना ग्रैवी (मानेतील), वक्षीय, कटी (कंबर), त्रिक्‌ (कंबर व माकडहाड यांमधील भाग) व अनुत्रिक्‌ (माकडहालहानिभाग म्हणतात. या प्रत्येक विभागातील मणक्यांची संख्या व रचना भिन्न असली, तरी सर्व मणक्यांच्या मूलभूत रचनेचा सांगाडा एकसारखा असतो. विविध प्राण्यांच्या जीवनपद्धतीनुसार त्यांच्या तपशीलांत फरक दिसून येतो.
मानवी कण्यामध्ये एकूण ३३ मणके असून त्यांचेही पाच प्रकार दिसून येतात. मणक्याच्या रचनेचे मूलभूत वर्णन प्रथम करून पुढे प्रत्येक विभागातील मणक्याचे वर्णन खाली दिले आहे.
मानवी मणक्यांची सर्वसाधारण रचना याचे दोन मुख्य भाग असतात. (१) पुढच्या जाड व गोलाकार अस्थींच्या भागाला कशेरुक काय असे नाव असून (२) मागच्या कमानीसारख्या भागाला कशेरुक चाप म्हणतात. या दोन भागांच्या मध्यभागी असलेल्या पोकळीस कशेरुक रंध्र असे म्हणतात. एकावर एक अशा बसविलेल्या मणक्यांमुळे या रंध्रांची मिळून एक पोकळ व लांब अशी गुहा तयार होते; त्या गुहेत मेरुरज्‍जू असतो.
(१) कशेरुक काय : मणक्याचा पुढचा भाग जाड व वर्तुलस्तंभाकार असतो. त्याचा बाह्यथर घट्ट, टणक व कठीण अशा हाडांचा बनलेला असतो. आतील भाग पोकळ स्पंजासारख्या हाडांचा बनलेला असतो. कशेरुक कायाचा वरचा व खालचा पृष्ठभाग खोलगट, चपटा व खडबडीत असतो. त्या ठिकाणी उपास्थिचक्रे घट्ट बसलेली असतात. कशेरुक कायाची पुढची बाजू फुगीर, बहिर्गोलाकार असून रंध्राकडील मागील बाजू खोलगटअंतर्गोलाकार असते. या मागील बाजूच्या पृष्ठभागामध्ये लहान छिद्रे दिसतात. या छिद्रांतून मणक्याला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात.
************************

हाडांच्या आरोग्यासाठी कोणता आहार योग्य असावा यासाठी आपण हाडांची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.
अ) अस्थींमधील महत्त्वाचे घटक : अस्थी ह्या प्रामुख्याने कॉलाजीन नावाच्या तंतुमय जाळ्याने बनलेल्या असतात ज्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे क्षार बांधलेले असतात. हाडांना त्यांची मजबुती प्रामुख्याने कॅल्शिअमच्या दाबसाहक क्षमतेमुळे व कॉलाजीनच्या तणावसाहक क्षमतेमुळे मिळते. हाडांमध्ये एकूण ७० टक्के कॅल्शिअम व फॉस्फरससारखी खनिजे असतात.
ब) अस्थींचे प्रकार : मानवी शरीराचा ८० टक्के सांगाडा cancellous bones पासून बनलेला असतो व २० टक्के भाग cancellous bones पासून बनलेला असतो. cancellous bones मऊ आणि कमी घनतेची असतात.
क) कॅल्शिअम व अस्थी : शरीरातील ८० टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये असते. रक्तातील व प्लाझ्मामधील कॅल्शिअमच्या पातळीचा समतोल अतिशय क्लिष्ट अशा पद्धतीने राखला जातो. जेव्हा आहारात कॅल्शिअम कमी प्रमाणात घेतले जाते आणि शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवू लागते तेव्हा हाडांमधील कॅल्शिअम व खनिजे रक्तात शोषली जातात आणि समतोल साधला जातो.
ड) हाडांचे पुनरुज्जीवन (bone remodelling): ही प्रक्रिया शरीरात सतत सुरू असते. त्यामुळे शरीराची वाढ, दैनंदिन जीवनातील कामे, रक्तातील कॅल्शिअमच्या पातळीचा समतोल साधणे, हाडांची किरकोळ दुखणी व fracture सारख्या दुखापती भरून काढणे यात मदत होते. ही प्रक्रिया विशिष्ट प्रकारच्या पेशींमुळे कार्यरत असते, त्यांना osteoblasts & osteoclasts असे म्हणतात. osteoclasts हाडांच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे तयार करतात, जी नंतर osteoblasts च्या प्रक्रियेमुळे पुन्हा नवीन अस्थी घटकांनी भरून निघतात आणि अशा प्रकारे हाडांचे पुनरुज्जीवन होते.
इ) bone mineral metabolism मधील महत्त्वाचे घटक :
-- मुख्य ions : कॅल्शिअम, फॉस्फरस व magnesium
-- मुख्य हॉर्मोन्स :
-- मुख्य organs : हाडे, किडनी व आतडे
ई) अस्थी घनता : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमधे अस्थी घनता कमी असते. तसेच काही वेळा आनुवांशिक कारणांमुळेसुद्धा अस्थी घनतेमध्ये कमतरता जाणवते. आहारातील कॅल्शिअमच्या प्रमाणावर व शारीरिक मेहनतीवर याचे प्रमाण अवलंबून असते. गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांमध्ये अस्थी घनतेचे प्रमाण वाढलेले संशोधनात सिद्ध झाले आहे. चाळिशीच्या दरम्यानच्या स्त्री आणि पुरुषांमध्ये या घनतेचे प्रमाण प्रतिवर्षी १.२ टक्के या प्रमाणात कमी कमी होत जाते.
अनेकदा अशी मिळालेली माहिती अति शास्त्रीय या नावाखाली आपण वाचतच नाही आणि मग जेव्हा व्याधी बळावतात तेव्हा त्या व्याधीविषयी प्राथमिक माहितीही आपल्याजवळ नसते. हाडांबद्दलच्या माहितीनंतर आता मुख्य विषय म्हणजे आहाराचे अस्थिरोगांमधील महत्त्व.
१) ओस्टो पोरोसिस (osteoporosis) : याचा शब्दश: अर्थ ठिसूळ हाडे असा होतो. भारतात सर्वसामान्यपणे होणारा अस्थिरोग आहे. यामध्ये हाडांची घनता कमी होते आणि खनिजे व क्षार यांच्या गुणोत्तरात तफावत होते. वय वृद्धत्वाकडे झुकू लागले की याची तीव्रता अधिक जाणवू लागते. osteoporosis ची तीव्रता वाढली की हाडांची दैनंदिन कामातील ताण सहन करायची क्षमता नाहीशी होते व fractures सारख्या दुखापती वारंवार होऊ लागतात. सरासरी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण ४ पटींनी अधिक असते. याचे २ प्रकार आढळून येतात.
प्रकार १ : रजोनिवृत्तीनंतर होणारा osteoporosis : हा प्रकार मध्यम वयातील व चाळिशीच्या पुढील स्त्रियांमध्ये आढळतो. या प्रकारात प्रामुख्याने मनगटातील आणि कंबरेच्या हाडांचे fractures दिसून येतात.
प्रकार २ : वृद्धत्वामुळे होणारे osteoporosis. ७० वर्षांवरील वयाच्या स्त्रीपुरुषांमध्ये हा प्रकार दिसून येतो. मणका व कंबरेच्या भागातील हाडाचे fractures यात मुख्यत्वे करून होतात.
वरील दोन्ही प्रकारांत vit D कमतरता समान असते.
याव्यतिरिक्त काही औषधांमुळेसुद्धा हाडांची झीज होऊ शकते.
पोषक आहाराचे महत्त्व : अ) कॅल्शिअम व vit D : osteoporosis मध्ये कॅल्शिअम व vit D ची कमतरता असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. म्हणून यामध्ये प्राथमिक पोषण हे कॅल्शिअम व vit D वर अवलंबून आहे.
कॅल्शिअम व vit D WZ हे परस्परपूरक घटक आहेत. त्यांच्या बांधणीमुळे हाडांची मजबुती व कार्यक्षमता ठरते, पण म्हणून फक्त याच दोन घटकांवर लक्ष केंद्रित करून उपयोग नाही. अन्नातून मिळणाऱ्या उष्मांका (कॅलरी)वरही लक्ष ठेवले पाहिजे.
कॅल्शिअम व vit D हे परस्परपूरक घटक आहेत. त्यांच्या बांधणीमुळे हाडांची मजबुती व कार्यक्षमता ठरते, पण म्हणून फक्त याच दोन घटकांवर लक्ष केंद्रित करून उपयोग नाही. अन्नातून मिळणाऱ्या उष्मांका(कॅलरी)वरही लक्ष ठेवले पाहिजे. कारण आधीच ठिसूळ झालेली हाडे वाढलेल्या वजनाचा अधिक ताण सहन करू शकत नाहीत.
National Academy of Nutritional Science ने खालीलप्रमाणे कॅल्शिअम व vit D चे प्रमाण ठरवले आहे.
१ वर्ष ते ३ वष्रे वयोमर्यादा : 700 mg कॅल्शिअम दरदिवशी
४ वष्रे ते ८ वष्रे वयोमर्यादा : 1000 mg कॅल्शिअम दरदिवशी
किशोरवयीन मुले व मुली : 1300 mg कॅल्शिअम दरदिवशी
प्रौढ व्यक्ती ७० वर्षांपर्यंत : 1000 mg कॅल्शिअम दरदिवशी
यातही ५१ वर्षांवरील स्त्रियांनी 1200 mg कॅल्शिअम दरदिवशी घेणे गरजेचे आहे.
हे कॅल्शिअम रक्तात नीट शोषले जाण्यासाठी व त्याचा पूर्णपणे उपयोग व्हावा यासाठी 600 IU vit D/day शरीरात जाणे गरजेचे आहे. अर्थात हे प्रमाण जरी कळले तरी ते मोजायचे कसे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो अनेकदा. त्यामुळे यासाठी डॉक्टरी सल्ला आवश्यक असतो. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार डॉक्टर काय खावे, काय नाही हे सांगू शकतात.
प्रथिने : शरीराची झालेली झीज प्रथिनांमुळे लवकर भरून निघते. त्यामुळे प्रथिनांचासुद्धा योग्य समावेश आहारात असणे गरजेचे आहे.तल
कॅल्शिअम व vit D पुरविणारे अन्नपदार्थ : दूध, दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यातून भरपूर प्रमाणात कॅल्शिअम व vit D मिळते. तसेच यातून फॉस्फरस व प्रथिनेसुद्धा व्यवस्थित प्रमाणात मिळतात.
याव्यतिरिक्त कॅल्शिअम खालील पदार्थातून मिळते :
१) cearals, fortified milk products, पनीर
२) हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, पालक
३) कवचयुक्त मासे : कोलंबी, शिंपले, खेकडे
vit D हे रोजच्या आहारातून कमी प्रमाणात मिळते. vit D शरीरात सूर्यप्रकाश व त्वचेच्या एकत्रित कार्याने तयार होते तसेच आहारातूनही ते मिळते. दुधातून vit D चांगल्या प्रमाणात मिळते.
-- ८ औंस ग्लास दुधातून 98 IU vit D मिळते.
-- काही विशिष्ट प्रकारचे मासे उदा. रावस, टय़ुना, बांगडे इत्यादी
-- vit D युक्त असे काही readymade अन्नपदार्थ.
जर आहार चांगला असूनसुद्धा कॅल्शिअम व vit D चे नीट शोषण होत नसेल तर आहाराव्यतिरिक्त काही वेळा nutiritional supplements बाहेरून घेण्याची गरज पडू शकते.
प्रथिनयुक्त अन्नपदार्थ, उदा. मासे, मटण, चिकन व डाळी यांचा आहारातील वापर अत्यल्प ठेवावा. शक्यतो मांसाहार वज्र्य करावा. मेदयुक्त अन्नपदार्थ टाळून कबरेदकांचा आहारात समावेश करावा. पाण्याचे प्रमाण २-३ लिटर असावे. त्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिडचा उत्सर्ग चांगल्या प्रमाणात होतो.
कॅल्शिअम supplements दोन प्रकारात आढळतात-
१) calcium carbonate : अन्नाबरोबर घेणे गरजेचे असते
२) calcium citrate : अन्नाबरोबर घेण्याची गरज नसते.
बऱ्याचशा कॅल्शिअम supplements मध्ये vit D असते. पण vit D चेसुद्धा वेगळे supplements बाजारात उपलब्ध आहेत, पण हेसुद्धा डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावेत.
२) सांधेदुखी (osteoarthritis) : या आजारात सांध्यांच्या मधली कुर्चा झिजत जाते. त्याची अनेक कारणे असू शकतात. जसे, अपघात किंवा आनुवांशिक कारणे अथवा इतर काही आजार, ज्यात सांधे सुजतात व त्यातील कुर्चा झिजते. सामान्यत: यामध्ये बोटांचे सांधे, अंगठय़ाचे सांधे, गुडघे, पायाचे घोटे यांना सूज येते. याची सुरुवात सांधे आखडणे व हळूहळू ते सुजणे यापासून होते आणि मग दुखणे वाढत जाते.
३) संधिवात  : हा दीर्घकालीन शारीरिक विकार आहे. यामध्ये सांध्यांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते सुजतात व आतील membrane ला सूज येते. त्यामुळे कुर्चा झिजत जाते. याची तीव्रता फक्त सांधेदुखीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असते. कोणतेही सांधे यात व्याधिग्रस्त होऊ शकतात, पण एकापेक्षा अधिक छोटे सांधे व हातापायांचे मधले सांधे जास्त प्रमाणात ग्रस्त होतात.
तीव्र वेदना, सांधे आखडणे व सूज येणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
संधिवात हा स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये ३:१ या प्रमाणात आढळतो. सामान्यपणे ३५ वर्षांवरील स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
आहाराने घ्यावयाची काळजी : वरील दोन्ही प्रकारात वजन प्रमाणात राखणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. osteoarthritis चे प्रमाण लठ्ठ व व्यक्तींमध्ये अधिक असते. वजनवाढीमुळे आधीच सुजलेल्या व दुखऱ्या सांध्यांवर वजन पडून त्यांची झीज अधिक प्रमाणात होऊ शकते. अशा व्यक्तींमध्ये वजन कमी करणे ही एक कसरत असते, कारण सांधेदुखीमुळे हालचालकरता येत नाही व त्यामुळे मेद घटण्याची आणि पर्यायाने वजन घटण्याची क्रिया मंदावते.
४) Gout : हा आनुवांशिक आजार आहे. यामध्ये purines च्या चयापचय क्रियेमध्ये चढउतार होतात. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तातील पातळी वाढते. या वाढलेल्या पातळीमुळे sodium urate चे स्फटिक तयार होतात व सांध्यांमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या tissues मध्ये जमा होतात. ह्या स्फटिकांना tophi म्हणतात. हे tophi सांध्यांची कार्यक्षमता नष्ट करते, ज्यामुळे chronic arthritis होऊ शकते.
हा आजार सामान्यत: ३५ वष्रे वयानंतर होऊ शकतो. यात वेदना पायाच्या अंगठय़ापासून सुरू होते व हळूहळू पायापर्यंत पोहोचते. लहानमोठी दुखापत झाली असता हे दुखणे डोके वर काढू शकते. त्याचप्रमाणे अतिप्रमाणात मेदयुक्त आहार व प्रथिनयुक्त आहार घेणे, मद्य प्राशन व आठी व्यायाम हे घटक gout च्या attack ला कारणीभूत ठरतात.
आहारात घ्यावयाची काळजी : मूलत: युरिक अ‍ॅसिड हे purines पासून शरीरात तयार होते. त्यामुळे कमी प्रमाणात purines असलेल्या अन्नपदार्थाचा आहारात समावेश करणे योग्य ठरते.
प्रथिनयुक्त अन्नपदार्थ, उदा. मासे, मटण, चिकन व डाळी यांचा आहारातील वापर अत्यल्प ठेवावा. शक्यतो मांसाहार वज्र्य करावा. मेदयुक्त अन्नपदार्थ टाळून कबरेदकांचा आहारात समावेश करावा. पाण्याचे प्रमाण २-३ लिटर असावे. त्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिडचा उत्सर्ग चांगल्या प्रमाणात होतो.
या आजारांबद्दल ही प्राथमिक माहिती मिळवून त्यानुसार आहारात सुधारणा नक्कीच घडवून आणता येऊ शकते मात्र केवळ अशा माहितीवरच अवलंबून राहणे अपुरे आहे. त्यामुळे यासंदर्भातील आपल्या शरीराला योग्य व नेमक्या आहारासाठी डॉक्टरांचे दर्शन घेणे फायद्याचे!
कॅल्शियम पुरवणारे पदार्थ (प्रति १०० ग्रॅम)- कॅल्शियमचे या पदार्थातील प्रमाण
बाजरी - ४२ मिलिग्रॅम
नाचणी- ३४४ मिलिग्रॅम
हरभरा डाळ- २०२ मिलिग्रॅम
उडीद डाळ- १५४ मिलिग्रॅम
सोयाबीन- २४० मिलिग्रॅम
हिरवा माठ आणि लाल माठ- ३०० ते ५०० मिलिग्रॅम
फ्लॉवरचा हिरवा पाला- ६२६ मिलिग्रॅम
नवलकोलाची पाने- ७४० मिलिग्रॅम
बदाम- २३० ग्रॅम
एक अंडे- ६० मिलिग्रॅम
चिकन- २५ मिलिग्रॅम
खारवलेले मासे- १००० ते १५०० मिलिग्रॅम मात्र हे मासे कोलेस्टेरॉलच्या दृष्टीकोनातून वाईट ठरतात.
मटण- १५० मिलिग्रॅम
गाईचे दूध- १२० मिलिग्रॅम
म्हशीचे दूध- २१० मिलिग्रॅम
दही- १४९ मिलिग्रॅम
चीझ- ७९० मिलिग्रॅम
************************
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला अनेक कारणे आहेत. आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
मणक्याचे आजार होण्याची कारणे
1> डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे.
2> खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे.
3> अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे.
4> पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.
5> स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा.
6> गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे.
7> जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद‌्भवतात.
8> संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो.
आजाराची लक्षणे
1> कंबरेत दुखणे, पायांना मुग्या येणे.
2> सकाळी उठताना त्रास होणे.
3> चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.
4> पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे.
5> मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.
6> शौचाला बसता न येणे.
7> चक्कर येणे.
8> हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे.
इत्यादी लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो. मणक्यातील गादी घासली जाते. त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते.
आयुर्वेद उपचार
1> सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही.
2> वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
पंचकर्मामध्ये : सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness) नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, यापन बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद‌्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही.
कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
पत्रपोटली - या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
नस्य - या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून येण्यास मदत होते.
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प, नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते.
पथ्यापथ्य : काय खावे / काय करावे. स्निग्ध, उष्ण असा आहार. गहू, नाचणी, उडीद, लसूण, आले, एरंड तेलाची चपाती.
योगासन : भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
अपथ्य- काय करू नये / काय खाऊ नये. वांगे,बटाटे, हरबरा डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत. अति परिश्रमाची कामे टाळावीत, जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा. आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते. जड वजनाच्या वस्तू उचलू नये. आंबट पदार्थ, दही, चिंच व आम्ल रसाचे विदाही पदार्थ  उदा. इडली, ढोकळा, पाव, डोसा बंद करावे. आतापर्यंत अनुभवातून अनेक रुग्णांना आॅरेशनशिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे.
*************************
अस्थिसंस्था आपल्या शरीराचे चलनवलन हाडे, सांधे व त्यांना हलवणारे स्नायू यांमुळे होते. बहुतेक सर्व शारीरिक हालचालींत हाडे व स्नायूंचा भाग असतो. मात्र पापणी,जीभ वगैरे काही भागांत मुख्यतः फक्त स्नायूंचेच काम असते
अस्थिसंस्थेच्या रचनेचे मुख्यतः चार भाग पडतात
पाठीचा कणा
डोक्याची कवटी
हात, खांदे, छातीच्या फासळया
पाय, खुबे व कमरेची हाडे
पाठीचा कणा हा मध्यभागी असून बाकीचे गट हे त्याला जोडलेले असतात. हातांची व पायांची स्थूल रचना बरीचशी सारखी असते. फक्त हाताच्या विशिष्ट ठेवणीमुळे अधिक कुशल हालचाल शक्य होते.
शरीराचा आकार व उंची ही अस्थिसंस्थेमुळेच असते. तसेच हालचालही यामुळेच शक्य होते. कवटीमुळे मेंदूचे संरक्षण होते. छातीच्या पिंज-यामुळे फुप्फुसे व हृदयाचे संरक्षण होते. कंबरेच्या हाडांमुळे लघवीची पिशवी, स्त्रियांची जननसंस्था, इत्यादी सुरक्षित राहतात.
हाडांची रचना कठीण पेशींनी बनलेली असते. त्यातला कठीणपणा चुन्याच्या क्षारांमुळे असतो. काही हाडांमध्ये पोकळया असून त्यांत रक्तपेशी तयार होतात. हाडांच्या रचनेवरुन व आकारांवरुन त्यांचे प्रकार पाडलेले आहेत. (उदा. चपटी हाडे, लांब हाडे).
सांधे सांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे. दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :
करवती (अचल) सांधा : यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.
बिजागरीचा सांधा : या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.
उखळीचा सांधा: खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.
सरकता सांधा : यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.
याखेरीज सांध्याला मजबुती येण्यासाठी बाजूंनी घट्ट पडद्याचे आवरण (सांधेकोष) असते. एखादा सांधा मुरगळतो तेव्हा या पडद्यांना ताण पडून इजा झालेली असते. या आवरणातून एक प्रकारचा तेलकट पदार्थ निघून हाडांची झीज होणे वाचते. हाडांचे एकमेकांवर घर्षण होऊ नये व हालचालींमुळे बसणारे धक्के कमी व्हावेत यासाठी हाडांवर मऊ कूर्चेचे आवरण असते. स्नायुसंस्था स्नायू म्हणजे गरजेनुसार आखूड-सैल होऊ शकणा-या असंख्य तंतूंची एक जुडी किंवा गट असतो. स्नायू बहुधा दोन वेगवेगळया हाडांना घट्ट जोडला गेलेला असतो. स्नायू आखडला की मधल्या सांध्यापाशी हालचाल होते. यामुळे हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. स्नायूंमुळे शरीरात पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कु-हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत सर्व गोष्टी घडतात. तसेच श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड, मल-मूत्रविसर्जन, अन्न गिळणे, घुसळणे, अशा सर्व क्रिया स्नायूंच्याच हालचालींमुळे होतात.
काही स्नायू आखडण्याची व सैल पडण्याची क्रिया आपल्या इच्छेने होते. या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. (उदा. हाताचे, पायाचे स्नायू). मात्र हृदय आतडी यांचे स्नायू आपल्या इच्छेशिवाय काम करतात, म्हणून या क्रिया आपल्याला फारशा जाणवत नाहीत. काही स्नायू इच्छेशिवाय किंवा इच्छेने अशा दोन्ही प्रकारची कामे करतात. उदा. छातीचे श्वसनाचे स्नायू आपोआप काम करत असतात. शिवाय आपण मुद्दाम श्वास घेऊ,रोखू, सोडू शकतो.
सर्व प्रकारच्या स्नायूंवर मेंदूचे नियंत्रण असते. विजेच्या किंवा टेलिफोनच्या जशा तारा असतात तसेच मेंदूपासून निघून चेतातंतू स्नायूंमध्ये जोडलेले असतात. स्नायूंमध्ये काय चालले आहे व त्यांनी काय करायचे आहे हे संदेश या चेतातंतूंमुळेच शक्य होतात. हे चेतातंतू तुटले तर हे काम बंद पडून स्नायू निर्जीव होतात.

स्नायू काम करतात ते इंधनाच्या जोरावर. इंधन म्हणून ग्लुकोज साखरेचा व प्राणवायूचा उपयोग होतो. ही साखर व प्राणवायू रक्तामार्फत प्रत्येक स्नायुतंतूपर्यंत पोहोचवली  जाते. साखर वापरल्यानंतर उरलेले टाकाऊ पदार्थ रक्तामार्फत उचलले जातात.
******************
*

No comments:

Post a Comment