प्रथोमोपचार पेटी
प्रथमोपचाराची पेटी
निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
चिकटपट्टी
त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस्
औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
बँड-एडस्
छोटी विजेरी (टॉर्च)
कैची
रबराचे हातमोजे (२ जोड्या)
छोटा चिमटा
सुई
स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे
अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
थर्मामीटर
पेट्रोलियम जेली
निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना
साबण
प्रथमोपचाराची पेटी
निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
चिकटपट्टी
त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस्
औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
बँड-एडस्
छोटी विजेरी (टॉर्च)
कैची
रबराचे हातमोजे (२ जोड्या)
छोटा चिमटा
सुई
स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे
अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
थर्मामीटर
पेट्रोलियम जेली
निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना
साबण
********************
विजेचा धक्का बसणे:-
प्रथमोपचार
तोंडावाटे श्वास कसा देतात?
हे ओळखणे सोपे असते कारण अशी व्यक्ती विजेच्या खांबाजवळ किंवा उपकरणाजवळ बेशुद्ध पडलेली असते.
प्रथमोपचार
ज्या माणसाला शॉक बसला आहे तो जर अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर त्याला अजिबात स्पर्श करायला जाऊ नका.
ह्या व्यक्तीस हात लावण्याआधी वीज बंद करा तसे करणे शक्य नसेल तर एका जाड आणि पूर्ण कोरड्या दोरखंडाच्या सहय्याने त्या व्यक्तीला ओढून घ्यावे
तिचा श्वास चालू असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा
श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या.
इतर काही दुस-या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.
डॉक्टरांना बोलवा
तोंडावाटे श्वास कसा देतात?
पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीला पालथे झोपवा. त्याच्या गळ्याभोवती, छातीपाशी किंवा कमरेपाशी काही घट्ट कपडे असतील तर ते सैल करा.
हनुवटी वर उचला आणि वरच्या बाजूनी डोके जितके मागे करता येईल तितके करा. (असे करण्यामुळे श्वासनलिकेतून फुफ्फुसात जाणारा मार्ग मोकळा होतो.)
अकृतीत दाखविल्याप्रमाणे तुमच्या बोटांच्या सहय्यने त्या व्यक्तीच्या नाकपुड्या बंद करा. म्हणजे श्वासनलिकेतून पाणी आत जाणे बंद होईल.
तुमचे तोंड त्या व्यक्तीच्या तोंडावर दाबून ठेऊन जमेल तितक्या जोरात हवा आत सोडा.
तुमचे तोंड बाजूला घेऊन त्या व्यक्तीला श्वास घेण्यास प्रयत्न करण्यासाठी आणि फुफ्फुसापर्यन्त हवा जाण्यासाठी मोकळी हवा मिळू द्या.
असे दर ५ - ६ सेकंदांनी करा.
त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास आणि ह्रदयाचे ठोके नीट सुरू होई पर्यन्त ही प्रक्रीया चालू ठेवा. ही प्रक्रीया कधी कधी पाच मिनिटात संपू शकते, तर कधी कधी त्याला एक तास सुद्धा जाऊ शकतो.
हे करण्यानी तुम्ही दमून जाल तेव्हा तिस-या व्यक्तीची मदत घ्या.
त्या व्यक्तीच्या घशात किंवा तोंडात पाणी गेले आहे असे आपल्याला आढळल्यास त्याला कुशीवर वळवावे आणि पाणी तोंडावाटे बाहेर जाईल असे बघावे.
त्या व्यक्तीचे तोंड फडक्याने आतून पुसून घ्यावे. (शुद्ध हरपलेली व्यक्ती कधीच चावत नाही.)
जर तुम्ही तोंडाला तोंड लावून पाणी काढण्यास तयार नसाल तर दोन तोंडांच्या मधे रुमाल ठेवा. परंतु ही प्रक्रीया तोंडाला तोंड लावून पाणी काढण्याइतकी प्रभावी नक्कीच नाही.
जेव्हा तुमच्या खात्रीने लक्षात येईल की ती व्यक्ती थोडा थोडा श्वास घ्यायला लागली आहे, आणि ह्रदयाचे ठोके सुद्धा नीट ऐकू येत आहेत तेव्हाच कृत्रीम श्वासोच्छ्वास बंद करा. तसेच छातीच्या डाव्याबाजूला कान लाऊन व्यवस्थित ठोके ऐका.
पाण्यातून बाहेर काढलेली व्यक्ती आता जर ठीक झाली असेल तर त्याला ऊबेत ठेवा. गार हवा लागू देऊ नका. डॉक्टर येईपर्यन्त, निदान अर्ध्या तासापुरते - हलू देऊ नका.
********************
भाजणे जळणे:-
भजण्याचे परिणाम विचित्र असतात - कातडी खराब होणे, हातपाय वेडेवाकडे होणे आणि मुख्य म्हणजे मानसिक धक्का. तसेच हे फार दूरगामी परिणाम आहेत. तातडीने, काळजीपूर्वक योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
जळणे आणि भाजणे
थेट आगीच्या संपर्काने तसेच काही संहत रसायनांमुळे कातडी जळते आणि भाजते. ह्याची काही मुख्य कारणे अशी -
स्वयंपाकघरातील गरम भांडी, तवे इ.
स्वयंपाकघरातील विजेवरची उपकरणे
विस्तव किंवा शेकोटीमूळे अचनाक आग लागणे किंवा भाजणे
अनपेक्षितपणे कपडे पेटणे
संहत रसायने व ब्लीच
अति सूर्यप्रकाश किंवा वारा
दोरांमुळे होणारी इजा
घरगुती कारणाने भाजल्यास त्यावर घरातच उपचार करणे गरजेचे आहे; स्वयंपाकघरात हे प्रकार सर्वाधिक संख्येने होत असल्याने उपायदेखील तेथेच होऊ शकतो. अर्थात मुळात असे प्रसंग होऊच नयेत ह्यासाठी काळजी घेणे हे सर्वोत्तम. भाजण्याचा सर्वाधिक धोका वृद्ध, अपंग आणि लहान मुलांना असतो - विशेषकरून रांगत्या बाळांना. अशांच्या जखमांची गंभीरपणे काळजी घ्या.
ह्या गोष्टी करणे टाळा
भाजण्याने शरीरावर होणारे परिणाम आणि डॉक्टरी मदत मिळेपर्यंत करायचे उपचार पाहण्याआधी आपण काय करू नये हे समजून घेऊ –
भाजलेल्या जागी कधीही लोणी, पीठ किंवा खाण्याचा सोडा लावू नका
जखमेवर तेल, मलम इ. लावू नका
जखमेवर फोड आल्यास ते फोडू नका
जखमेला गरजेपक्षा जास्त हात लावू नका
जखमेवर कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढू नका
आजकाल कृत्रिम धाग्याने बनवलेले कपडे वापरले जातात. पण अशा प्रसंगी ते चक्क वितळतात आणि कातडीला चिकटून बसतात. त्यामुळे ते ओढून काढल्यास त्याबरोबर कातडीही सोलली जाते. ह्याने दुखणे तर वाढतेच शिवाय नंतर त्या जखमेत जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे प्रथमोपचारा दरम्यान कपड्यांना हात न लावणे चांगले..
सर्वसाधारण उपचार
भाजण्याचे काही विशिष्ठ प्रकार सोडले तर उपचार साधारणपणे सारखेच आहेत - सर्वप्रथम जखमा किती मोठ्या किंवा गंभीर आहेत ह्याचा अंदाज घ्या. भाजणे साधारणपणे आणीबाणीच्या प्रसंगांशी किंवा अपघातांशी निगडित असते - उदा. घराला आग लागणे, रस्त्यावरील अपघातात पेट्रोल पेटणे इ. म्हणूनच मदत करण्याचे नियमही तितकेच महत्वाचे आहेत. भाजलेली व्यक्ती घाबरलेली असते, तिला मानसिक धक्का बसलेला असतो. अशावेळी आपण स्वतः शांत राहून ग्रस्त व्यक्तीला धीर देणे आवश्यक आहे. गोंधळून न जाता तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. कातडी आणि पेशी जळाल्यावर शरीरातील द्रवपदार्थ कमी होतो. जळालेल्या कातडीत ऊष्णता साठून अधिकच नुकसान होते. त्यमुळे पहिल्यांदा ही ऊष्णता कमी करणे म्हणजेच शरीर थंड करून त्याचे तापमान कमी करणे आवश्यक असते.
ही काळजी घ्या
भाजलेला अवयव थंड पाण्यात बुडवा. एखादी बादली किंवा कपडे धुण्यासाठीचे मोठे बेसिन ह्यासाठी वापरता येईल. किंवा नळातून येणार्या पाण्याच्या हलक्या धारेखाली धरा.
थंड पाणी टाकण्याचा हा उपाय किमान १५ मिनिटे किंवा दुःख कमी होईपर्यंत करा. काही अवयव पाण्यात बुडवणे शक्य नसते - उदा. भाजलेले तोंड - अशावेळी स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून वापरा. कापडाची ही पट्टी बदलत रहा मात्र भाजल्याची जागा तिने घासू नका. ह्यामुळे त्या भागातील ऊष्णता काढून घेतली जाईल आणि फोड येण्यासारख्या पुढच्या दुःखदायक गोष्टी काही प्रमाणात टाळता येतील.
शरीरावर घट्ट बसणार्या बांगड्या, आंगठ्या, पायातील बूट अशांसारख्या वस्तू शक्य तितक्या लवकर काढून घ्या कारण कालांतराने अंगावर सूज येऊ शकते.
भाजल्याच्या छोट्या आणि वरवरच्या जखमा हलक्या हाताने पुसून त्यांवर बँडेज बांधता येईल. मात्र मोठ्या आकाराच्या आणि खोल जखमा, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, स्वच्छ व नुकत्याच धुतलेल्या व सुत न निघणार्या कापडाने हलक्या हाताने झाकाव्या. (हातापायांसाठी उशीचा स्वच्छ अभ्रा वापरता येईल)
डॉक्टरांना किंवा रुग्णवाहिकेला बोलवा.
पोस्टाच्या तिकिटापेक्षा म्हणजे साधारण दोनअडीच सेंटिमीटरपेक्षा मोठी जखम डॉक्टरांनी पाहणे आवश्यक असते.
गंभीर भाजण्याच्या प्रकारात रुग्णाला दवाखान्यात नेईपर्यंतच्या काळात जखमेवर बर्फाचा चुरा कापडातून बांधता येईल.
जंतुसंसर्ग टाळण्यासाठी भाजल्याची जखम झाकणे अत्यंत गरजेचे आहे. ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे भाजलेल्या व्यक्तिला आपल्या जखमा थेट दिसत नसल्याने त्याची भीती जरा कमी होऊन तो शांत राहतो. पांघरण्यासाठी आदर्श म्हणजे टेबलक्लॉथ किंवा चादर (अर्थात नायलॉनची नव्हे).
डॉक्टर येईपर्यंत भाजलेल्या व्यक्तिला धीर द्या. लहान मुलास प्रेमाने वागवा.
विशेष काळजी घेण्याजोगे प्रसंगकपडे पेटणे
भाजलेल्या व्यक्तिच्या जळत्या कपड्यांवर पाणी टाका किंवा आग विझविण्यासाठी त्यास कोट, चादर, ब्लँकेट किंवा अशाच एखाद्या मोठ्या कपड्यात हलकेच गुंडाळा. आपण विझवत असलेली आग आणि आपण स्वतः ह्यामध्ये हा कपडा राहील ह्याची काळजी घ्या म्हणजे आपले अंग भाजणार नाही.
आग लागलेली व्यक्ती घाबरून इकडे तिकडे पळण्याची आणि ह्यामुळे आग आणखीनच पसरण्याची शक्यता असते. तसेच ही व्यक्ती मोकळ्या हवेत गेल्यास आग आणखी भडकू शकते. म्हणून तिला शक्य तितके एका जागी थांबवण्यचा प्रयत्न करा.
आगीच्या ज्वाला विझल्यानंतरदेखील प्रथमोपचार चालू ठेवा.
डोळ्यात रसायन उडणे
हा प्रकार फारच गंभीर असून जखमी व्यक्ती कायमची आंधळी होण्याची शक्यता असते. म्हणूच जो काही उपाय कारावयचा असेल तो तातडीने करावा लागतो कारण हे रसायन पातळ होऊन त्याची ताकद कमी होणे गरजेचे असते.
अशा व्यक्तीस पाठीवर उताणे झोपवा, आंगठा व पहिल्या बोटाने तिचे डोळा उघडून धरून त्यामध्ये सतत थंड पाणी ओतत रहा. हे पाणी नाकाच्या बाजूने ओता म्हणजे दुसरा डोळा त्यापासून सुरक्षित राहील.
ह्यानंतर डोळ्यांची सतत उघडमीट करवा म्हणजे पापण्यांच्या आत बसलेले रसायन निघू शकेल
किमान दहा मिनिटे डोळा धुवा, ह्या वेळेमध्ये कोणतीही काटकसर करू नका.
ह्यानंतर डोळ्यांवर हलक्या हाताने पट्टी बांधा व ती जागेवरून सरकत नाही हे पहा
जखमीस धीर द्या आणि त्यास दवाखान्यात घेऊन जा.
विजेमुळे भाजणे
ह्या जखमा आकारने लहान दिसतात पण खोल असू शकतात. विजेचा प्रवाह ज्या ठिकाणी शरीरात प्रवेश करतो आणि जेथून बाहेर पडतो तिथे साधारणपणे ह्या आढळतात.
उपचार करण्याआधी वीज बंद करून भिंतीवरील सॉकेटमधून प्लग सोडवा.
ही व्यक्ती पाण्यात पडली असल्यास तुम्ही स्वतः पाण्यात जाऊ नका --- एखादेवेळी तुम्हांलाच विजेचा धक्का बसेल कारण कोणत्याही प्रकारच्या दमट पदार्थातून वीज चटकन वाहते. म्हणूनच जखमीच्या काखेत हात घालून ओढू नका.
ह्या व्यक्तीचा श्वास तपासा. वीज छातीतून गेली असल्यास हृदय आणि परिणामी श्वसन थांबले असेल. असे असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या.
भाजण्यावरचे प्रथमोपचार चालू ठेवा
*******************************
फिट येणे:-
त्वारीत ऊपचारासाठी काही पद्धती
काय करू नये...
स्नायु एकदम घट्ट आणि कडक होतात, व त्यानेतर झटके येऊ लागतात. रुग्ण जिभ चावु शकतो वा श्वास घेणे थांबवु शकतो. तोंड किंवा ओठ निळे पडु शकतात खुग जास्त प्रमाणात लाळ गळु लागते वा तोंडातुन फेस येवु लागतो.
जर रुग्णाने श्वासोश्वास थांबविला तर ते चांगले लक्षण नाही. अशा वेळी, ताबडतोब डाँक्टर कडे धाव घ्या.
त्वारीत ऊपचारासाठी काही पद्धती
रुग्णा जवळचे सगळ्या वस्तु दुर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ द्या.
रुग्णाने श्वास घेणे थांबविले तर,त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग ऊघडण्याचा प्रयत्न करा
शांत रहा व रुग्णाला दक्षता मिळे पर्यंत मदत करा.
दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
बहुतेक फिट ही थांबुन थांबुन परत परत येते किंवा नंतर बेशुद्धावस्था येते.
काय करू नये...
पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.
थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
******************************
घोळाणा फुटणे:-
घोळणा फुटला तर...
नाकातून रक्त येणे अथवा घोळणा फुटणे हे लक्षणही बऱ्याचदा आढळते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षण अधिक प्रमाणात आढळते. मात्र उन्हाळ्यात, शरद ऋतूत, पित्त वाढले असताही नाकातून रक्त येणाऱ्या व्यक्ती असतात. वारंवार नाकाचा घोळणा फुटत असल्यास त्वरेने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे, मात्र प्राथमिक उपचारात व्यक्तीला आडवे झोपवणे, नाकावर, कपाळावर व डोक्यावर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे यासारखे उपाय करावे लागतात. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद, धात्री रसायनसारखे शीतल रसायन घेणे, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, हे उपायही प्रभावी होत.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नाकाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे नाकाद्वारा करता येणारे नस्य. औषधांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे नस्य हा रोज करावा असा उपचार होय. ज्यायोगे नुसते नाकाचीच नव्हे, तर मेंदू व इतर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता टिकविण्यास, वाढण्यास मदत होते.
घसा हासुद्धा शरीरातील एक महत्त्वाचा भाग होय. अन्न-पाणी शरीरात
घेणे, बोलणे, श्वासोच्छ्वास वगैरे अनेक क्रिया घशाशी संबंधित असतात. घसा अतिशय संवेदनशील अवयव असतो. मसालेदार पदार्थ, तिखट, थंड किंवा गरम पदार्थ, तंबाखू वगैरेंचा घशावर दुष्परिणाम होत असतो. टॉन्सिल या रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित ग्रंथीसुद्धा घशातच असतात. शरीरात जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून या ग्रंथींची घशात योजना केलेली असते, मात्र टॉन्सिल्स सुजल्या की घसाही दुखू लागतो, खाणे-पिणे-बोलणे वगैरे क्रिया अवघड होत जातात. घशाचे आरोग्य टिकवायचे असेल तर टॉन्सिल्सची काळजी घेणे आवश्यक असते.
****************************
घशाची काळजी:-
आयुर्वेदात कंठ हे प्राणाच्या दहा स्थानांपैकी एक सांगितले आहे, आणि घशाचा कंठात अंतर्भाव होत असल्याने घशाची काळजी घेणे अत्यावश्यक होय.
घसा चांगला राहावा यासाठी प्यायचे पाणी उकळून घेणे, हा सर्वांत सोपा व प्रभावी उपाय होय. पाणी फिल्टर केले तरी नंतर ते 15-20 मिनिटांसाठी उकळून घेतले व थर्मासमध्ये भरून ठेवून आवश्यकतेनुसार गरम / कोमट असताना प्यायले तर घसा चांगला राहण्यास मदत मिळते.
विशेष औषधांनी सिद्ध तेल- उदा. सुमुख तेलासारखे तेल- मुखात 10-12 मिनिटांसाठी धरून ठेवणे म्हणजेच गंडूष करणे हे दात, हिरड्या, मुखाच्या आरोग्याबरोबरच घशासाठीसुद्धा हितावह असते, वारंवार घसा बसू नये, दुखू नये, घशामध्ये कफ अडकून राहू नये यासाठी नियमित गंडूष करणे उत्तम होय.
हवेतील जंतुसंसर्गाचा घशावर लगेच दुष्परिणाम होतो. त्यामुळे वारंवार घसा दुखणे, लाल होणे वगैरे त्रास असणाऱ्यांनी घरात सकाळ, संध्याकाळ धूप करणे चांगले होय. ओवा, वेखंड, कडुनिंबाची पाने, ऊद, गुग्गुळ वगैरे द्रव्ये किंवा तयार संतुलन प्युरिफायर धूप, संतुलन सुरक्षा धूप करणे उत्तम होय.
तरीही वातावरणातील बदलामुळे घशात खवखव होऊ लागली तर लवकरात लवकर सितोपलादी चूर्ण गरम पाण्यासह किंवा मधासह दिवसातून दोन-तीन वेळा घेणे उपयोगी असते. बरोबरीने कपभर पाण्यात दोन चिमूट हळद एक-दोन तासांसाठी भिजवून ठेवली, नंतर सुती कापडातून गाळून घेतली व हळदीच्या पाण्यात थोडे मीठ व थोडे गरम पाणी मिसळून या तयार मिश्रणाच्या गुळण्या केल्या तरी लगेच बरे वाटते.
चांगल्या प्रतीची खडीसाखर किंवा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळल्यानेदेखील घसा व आवाज चांगला राहतो. कंकोळ नावाचे मिऱ्यासारखे दिसणारे दाणे आयुर्वेदात कंठाला, तसेच आवाजाला हितकर सांगितले आहेत. ज्येष्ठमधाचे चूर्ण व कंकोळाचे चूर्ण रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिण्याने घसा चांगला राहतो, आवाज बिघडत नाही. कात, कंकोळ, दालचिनी, वेलची वगैरे टाकून केलेला त्रयोदशगुणी विडा (तंबाखूविरहित) खाण्याने घशाचे आरोग्य चांगले राहते.
थंडीच्या दिवसांत किंवा वारा फार सुटलेला असताना गळ्याभोवती मफलर वा स्कार्फ बांधणे, रात्री कोल्ड्रिंक्स, पिणे, आइस्क्रीम खाणे टाळणे, चिंच, रायआवळे, अननसासारखे आंबट पदार्थ शक्यतो टाळणे, फ्रिजमधील थंड पाणी न पिणे वगैरे गोष्टी सांभाळल्या तर घशाचे आरोग्य नीट राहण्यास मदत मिळेल.
आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याप्रमाणे "ईएनटी‘ म्हणजे "कान, नाक, घसा‘ असा विशेष विभाग असतो, तसेच आयुर्वेदातही शालाक्य तंत्र वेगळे सांगितले आहे. यात कान, नाक, घसा, तसेच डोळे, डोके, मेंदू यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, रोग झाल्यास काय उपचार करावेत, याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. कान, नाक, घसा यांच्यात इतका जवळचा संबंध आहे, की कर्णपूरण, नस्य, नेत्रबस्ती, शिरोधारा वगैरे उपचार या सर्व अवयवांसाठी उपयोगी असतात. घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार आणि आवश्यकता पडल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असे विशेष उपचार करून घेतले तर कान, नाक व घसा या महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य सांभाळता येईल.
*

No comments:
Post a Comment