जीवन कौशल्य
**********************************
*
दृष्टिकोन’ नेमका काय आहे, कसा आहे - याची ओळख या लेखाद्वारे करून दिलेली आहे.
जीवन कौशल्य शिक्षण
जीवन कौशल्यांमधे दैनंदिन जीवनात उपयोगी असणार्या सर्वसाधारण पण महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश होतो. यात किमान दहा कौशल्यांचा अंतर्भाव हवा.
ही कौशल्ये पुढीलप्रमाणे -
१) निर्णय क्षमता
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही प्रत्येकाला निर्णय घ्यावाच लागतो. अगदी साधी मुलांच्याच बाबतीतली गोष्ट - दोन खेळणी समोर असतील आणि त्यातील एकच निवडायचे असेल तर दोनपैकी कोणते निवडायचे याचा निर्णय. अशा छोट्या गोष्टींपासून ते अगदी नोकरीच्या दोन आकर्षक संधींपैकी एकाची निवड करणे इथपर्यंत. पुढील आयुष्यातही अशी परिस्थिती सतत येतच असते. अशावेळी सारासार विचार करून निर्णय घेणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. म्हणूनच ही क्षमता विकसित करणे आवश्यक ठरते.
२) समस्या निवारण
दैनंदिन जीवनात अनेक छोट्या-मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्या सोडवण्यासाठी त्या त्या वेळी पर्याय सुचणे आणि त्याद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचं.
३) विश्लेषणात्मक विचारक्षमता
अनेक कौशल्यं ही एकमेकाधारित तसेच पूरक असतात. उदा. परिस्थितीचे नेमके विश्लेषण करता आले तर समस्या सोडवायला मदत होते.
४) सृजनात्मक विचारक्षमता
सृजनाबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. सृजनशीलता म्हणजे काहीतरी अद्वितीय घडवणं जे आजतागायत कोणी केलं नसेल, असं चुकीचं परिमाण आपण सृजनशीलतेला उगीचच देत असतो. सृजनशीलता म्हणजे नाविन्याची निर्मिती हे खरं आहे. पण इथली नाविन्याची कल्पना ही सापेक्ष आहे, खरं तर व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आजवर केलेल्या विचारापेक्षा नवीन वेगळा विचार, नवीन कलाकृती - या दृष्टिकोनातून तिचं नाविन्य ठरते. आणि म्हणूनच नवनिर्मिती करत राहणं ही सृजनशीलता ठरते. ती एक प्रक्रिया आहे जी सातत्याने घडत राहते. त्या प्रक्रियेतून निष्पन्न झालेली गोष्ट ही त्या प्रक्रियेचा तात्कालिक परिणाम. सृजनक्षमतेच्या दृष्टिकोनातून कमी महत्त्वाचा. नवनिर्मितीसाठी एकाच पद्धतीने विचार करून चालत नाही. तर एखाद्या परिस्थितीचा अनेक मार्गांनी विचार करणं आवश्यक असतं. ही बहुदिश विचारक्षमता - पर्यायाने सृजनात्मक विचारक्षमता. समस्या निवारणासाठी ही बहुदिश विचारक्षमता खूपच उपयोगी ठरते.
५) प्रभावी संवाद
संवादातून अभिप्रेत असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी तो संवाद प्रभावी असण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात बोलण्याचा - मुद्दे मांडण्याचा क्रम, कोणत्या मुद्यावर भर देणं अपेक्षित आहे, उच्चारणातील आघात, सौम्यपणा, ठामपणा, सुस्पष्टता, इ. अनेक गोष्टी संवाद प्रभावी होण्यास साहाय्यभूत ठरतात.
६) आंतरव्यक्तिक संबंध
समाजात वावरताना आपल्या सभोवतालच्या व्यक्तींबरोबर आपले नातेसंबंध कसे आहेत यावर आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. आपल्याबद्दल इतरांचं जे मत असतं त्यावर आपलं समाजातलं स्थान अवलंबून असतं. नि त्या स्थानावर अथवा मान्यतेवर आपली स्व-प्रतिमाही ठरत जाते.
७) स्व-जागृती
थोडक्यात स्वतःबद्दलची नेमकी माहिती. स्वतःची बलस्थाने, उणिवा यांची जाण ठेवून त्यांना स्वीकारणे, त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे.
८) सहजाणीव
सहानुभूतिपेक्षा वेगळी. दुसर्याणची परिस्थिती, अवस्था समजावून घेणे, पण त्यात वाहवत जात नाही ना याचं भान ठेवून वागणे.
९) तणावाशी समायोजन
अनेक प्रकारच्या ताण-तणावांनी आजचं जीवन व्यापलेलं आहे. या तणावांशी सामना करत, जुळवून घेणे आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे.
१०) भावनांशी समायोजन
कोणत्याही परिस्थितीला कलाटणी देण्यास आणि आपल्याला क्लेश देण्यास कारणीभूत असतात त्या भावना. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना योग्य वळण लावणे, योग्य पद्धतीने त्या व्यक्त करणे, योग्यवेळी, योग्य त्या मार्गाने त्यांचा निचरा करणे आवश्यक असते. कारण या सगळ्याचा अंतिमतः संबंध आपल्या मानसिक स्वास्थ्याशी असतो.
ही सारी कौशल्यं आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहेत. अनेक संदर्भांबाबत त्यांचा वापर करावा लागतो.
****************************

No comments:
Post a Comment